'आदिपुरुष' चित्रपटाविरुद्ध दिल्ली न्यायालयात याचिका; १० ऑक्टोबरला होणार सुनावणी 

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध सैफ अली खान आणि अभिनेता प्रभास 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या टीझरवर टीका केली. काहींनी या टीझरमधील सैफच्या लूकवर टीका केली तर काहींनी टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या वीएफएक्स वर आक्षेप घेतला. आता आदिपुरषचा हा वाद दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयापर्यंत पोहचला आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, यूट्यूबसह इंटरनेट मीडियाला चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आणि टीझरमधून आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. 'आदिपुरुष' चित्रपटात भगवान राम आणि हनुमानाची पात्रे चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही याचिकाकर्ते राज गौरव यांचे मत आहे.


यासोबतच या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणावर सोमवारी सकाळी १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रामायणासारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरूपाची छेडछाड करता येणार नाही. रामायण हा भारताच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि आध्यात्मिक आणि धर्माचा भाग आहे. ते म्हणाले की, भगवान रामाची प्रतिमा शांत होती, तर आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरमध्ये ते अत्याचारी, प्रतिशोधी आणि संतप्त व्यक्ती म्हणून दाखवले आहेत.

Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार