राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डायव्हिंगमध्ये मेधालीचे "स्वप्नवत सुवर्णपदक"

राजकोट (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेधाली रेडकर हिने डायव्हिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. तिची सहकारी ऋतिका श्रीराम हिने कांस्यपदक पटकावित येथे तिसऱ्या पदकाची नोंद केली.


एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधाली हिने लवचिकता व आकर्षक रचना याचा सुरेख समन्वय दाखवत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. ती मुंबई येथे तुषार गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. व्यवसायाने फिजिओ असलेल्या या खेळाडूने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरपूर पदके जिंकली आहेत.


सुवर्णपदक मिळवल्यानंतर मेधाली रेडकरने सांगितले की," आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर मला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे येथे सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय होते आणि मी सर्वोच्च कौशल्य दाखविले. राष्ट्रीय स्तरावर पहिले सुवर्णपदक मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हे सुवर्णपदक माझ्या भावी करिअरसाठी प्रेरणादायकच आहे."


ऋतिकाची पदकांची हॅटट्रिक


ऋतिका श्रीराम हिने येथे पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. तिने याआधी या स्पर्धेत तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड व हाय बोर्ड प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. तिचे पती आणि आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू हरी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात