मुंबई : देशभरात विजयादशमी, दसऱ्याचा सण साजरा होत असताना सराफा बाजारात कामकाजाच्या गेल्या ५ सत्रांमध्ये सोने प्रति १० ग्रॅम सुमारे १८०० रुपयांनी महागले आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार असून दिवाळीपर्यंत सोने आणखी महागणार आहे. तज्ज्ञांच्या मते धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.
आज, बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, आज १० ग्रॅम आणि ८ ग्रॅम २४ कॅरेटचं सोनं किंमत अनुक्रमे रु. ५१,६६० आणि रु. ४१,३२८ आहे, जे अनुक्रमे रु. ५५० आणि रु. ४४० ने वाढले आहे. तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आता रु. ४७,३५९ वर आहे, जी एका दिवसापूर्वी म्हणजेच मंगळवारी ४७,८५० रुपये होती. दुसरीकडे, ८ ग्रॅम २२ कॅरेट सोनं रु. ३७,८८० रुपयांनी उपलब्ध आहे, जे मंगळवारी रु. ३७,४८० वरून वाढला आहे.
दरम्यान, चांदीही कालच्या तुलनेत महागली आहे. गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार प्रति १० ग्रॅम चांदी रु. ६१८ आणि प्रति १०० ग्रॅम, रु. ६,१८० रुपयात उपलब्ध आहे.
सोनं खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांनी लक्षात घ्या की वर नमूद केलेले दर, वस्तू आणि सेवा कर (GST), स्रोतावर जमा केलेले कर (TCS) आणि इतर शुल्काशिवाय आहेत. त्यामुळे अचूक दरासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक सोनार/ज्वेलरशी संपर्क साधू शकता.
गेल्या ५ व्यापार सत्रांमध्ये सोने १८०१ रुपयांनी महागले असून दर ४९३६८ रुपयांवरून ५११६९ रुपयांवर पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यास भारतात सोने महाग होते. आंतरराष्ट्रीय घटकांमध्ये अस्थिर धोरणे, मंदावलेली आर्थिक वाढ आणि अमेरिकन डॉलरची ताकद यांचा समावेश होतो.
सोन्याच्या किमती या आर्थिक वाढ, महागाई, डॉलर निर्देशांक आणि उच्च रोखे उत्पन्न यावर अवलंबून असतात. सणासुदीचा सोन्याच्या दरावर कोणताही परिणाम होत नाही, असे स्मॉलकेसचे संस्थापक दिवम शर्मा म्हणाले.
दुसरीकडे, एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, “अमेरिकन सिक्युरिटीजच्या उत्पन्नामुळे आणि डॉलरच्या निर्देशांकात सतत घसरण झाल्याने कमोडिटी मार्केटमध्ये (कॉमेक्स) सोन्याचा भाव वाढला.”
मोतीलाल ओसवाल फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांच्या मते, काही दिवसांपूर्वी फेडची आक्रमक व्याजदराची भूमिका, डॉलरमधील अस्थिरता आणि रोखे उत्पन्नातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या खरेदीत नकारात्मकता आली होती. आता देशांतर्गत आघाडीवर, सर्वसाधारणपणे सण आणि लग्नाच्या काळात सोन्याची मागणी वाढत आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…