राऊतांचा दसरा कोठडीतच

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ केली असून १० ऑक्टोबरपर्यंत त्यांचा मुक्काम ईडी कोठडीत असणार आहे. दरम्यान, १० ऑक्टोबर रोजीच याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यासह राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणीही एकाचवेळी होणार आहे.


गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना जूनमध्ये ईडीने अटक केली होती. त्यानंतर राऊतांना न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. या कोठडीत पुन्हा वाढ केल्याने यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात संजय राऊत हजर राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.


पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे. तर ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Comments
Add Comment

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काय घ्यावी खबरदारी, घ्या जाणून

मुंबई : दिपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग,

मुंबईतील डबेवाले सोमवारपासून सुट्टीवर

मुंबई : मुंबईतील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पुरविणारे शेकडो डबेवाले येत्या २०

मागच्या दीपोत्सवात केली तक्रार, आता त्याच कार्यक्रमाचे करणार उद्घाटन...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मनसेच्यावतीने यंदाही छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून

गर्दी नियमनासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार — सीएसटी, ठाणे, कल्याणसह ६ स्थानकांवर तात्पुरती बंदी

रायगड : दिवाळी आणि छठ पूजेसारख्या मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची प्रचंड

अरे चाललंय काय? आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवण्यासाठी मोहीम!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रस्तावित विकास आराखड्या विरोधात 'SGNP वाचवा' मोहीम नागरिक आणि आदिवासी

दिवाळीच्या सुट्टीत राणीबागेत करा मज्जा.. महापालिकेने बच्चे मंडळींसाठी घेतला 'हा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना व विशेषतः बच्चे कंपनीला दिवाळी सुटीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा,