मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठीच महापालिका प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले असून निवडणुकीच्या कामाकरिता लागणाऱ्या वस्तूंची खरेदी प्रक्रिया देखील सुरू केली आहे. त्यातील मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर स्टॅम्प पॅड ठेवण्यासाठी सुमारे १५ हजार स्टॅम्प पॅडची खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली असून या प्रक्रीयेनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. तर इतरही साहित्यांची खरेदी केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तारखेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असून अजूनही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही.
फेब्रुवारीपर्यंत तरी निवडणुका लांबणीवर पडल्याचे दिसते. मात्र असे असूनही पालिका मात्र निवडणुकीच्या कामाला लागली असून शहर व उपनगरात किमान ९ हजार मतदान बुथची आवश्यकता भासणार आहे. एक बुथवर किमान एक व पर्याय म्हणून आणखी एक असे दोन “स्टँप पॅड” ची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे पालिकेकडून आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…