वसई : वसईत ई स्कुटर बॅटरीच्या झालेल्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाला.
वसई पूर्वेकडील रामदास नगर येथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्याना आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे साडे पाचच्या सुमारास बॅटरीचा भीषण स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले.
शब्बीर हा ७० ते ८० टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. स्कुटी कंपनीच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप मृत बालकाच्या कुटुंबियांनी केला आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…