धुळे : शहरातील ऐंशीफूटी रोडवरील नटराज थिएटर परिसरात नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या संशयित तरुणाला आझादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४ हजार किमतीच्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणि गोळ्या जप्त केल्या.
नशेच्या गोळ्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी अन्न- औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक प्रशांत ब्राम्हणकर यांच्यासह संयुक्त कारवाई केली. नटराज थिएटर परिसरातून पत्र्याच्या शेडच्या आडोशाला संशयित कापडी पिशवी दिसली. पोलिस पथक दिसताच संशयिताने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र त्याला पोलिसांनी पकडले.
त्याच्या पिशवीत १४ हजार किमतीच्या ८६ औषधी बाटल्या, गुलाबी रंगाच्या गुंगीच्या गोळ्या आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी गणेश प्रवीण सोनार (वय ३०, रा. काझी प्लॉट, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक अधिकारी पावरा, उपनिरीक्षक मोरे, कर्मचारी प्रकाश माळी, शोएब बेग, संदीप कढरे, योगेश शिंदे, संतोष घुगे, प्रमोद खैरनार, प्रवीण खैरनार, हरिश गोऱ्हे, आतीक शेख यांनी ही कारवाई केली.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…