मुंबई (वार्ताहर) : टेनिस प्रीमियर लीगच्या (टीपीएल) चौथ्या हंगामासाठीच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये महाराष्ट्राच्या अर्जुन कढे याला ६ लाख ७० हजार रुपयांची, तर अंकिता रैना हिला ५.५० लाख रुपयांची, ऋतुजा भोसलेला ३.६५ लाख रुपयांची बोली लागली. पुणेकर अर्जुन आणि अहमदनगरच्या ऋतुजा यांना पुणे जग्वार्स संघाने करारबद्ध केले. पुण्याच्या अंकिता हिच्यावर गुजरात पँथर्सने विश्वास दाखवला.
पुरुष गटात १२ आणि महिला गटात ४ खेळाडूंचा समावेश आहे. यात महाराष्ट्राचे चार टेनिसपटू आहेत. पुरुष खेळाडूंमध्ये रामकुमार रामनाथन आणि अर्जुन कढे यांची (प्रत्येकी ६.७० लाख रुपये) बोली समान आहे.
अर्जुननंतर सिद्धांत भाटिया याच्यावरही (१.५० लाख रुपये) बोली लागली. त्याला दिल्ली बिनीज् ब्रिगेड संघाने करारबद्ध केले. पुरुष टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक बोली २०२२ विम्बल्डन स्पर्धेतील दुहेरीतील विजेता ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू इब्डेन याला लागली. दिल्ली बिनीज् ब्रिगेड संघाने त्याला ८.४५ लाख रुपयांना करारबद्ध केले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…