बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू

  130

बोईसर (वार्ताहर) : प्रेम प्रकरणातून तरुणीवर भर रस्त्यात पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी टीमा हॉस्पिटल समोर घडली. यामध्ये सदर तरुणाचा देखील अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.


बोईसरमधील टीमा रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कृष्णा यादव (रा. कोलवडे) या माथेफिरू तरुणाने स्नेहा मेहतो (रा. सरावली वय २१) या तरुणीची पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली. गोळी मारून पळून जात असताना, डी डेकोर कंपनीजवळ सीआयएसएफ च्या गाडीखाली आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला टीमा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादारम्यान त्याचा देखील मृत्यू झाला आहे.


बोईसर पोलिसांना या घटनेची खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने बोईसर परिसरात खळबळ माजली आहे. माथेफिरू तरुणाने प्रेम प्रकरणातून गोळी झाडून तरुणीची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा, पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे उपस्थित असून या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी

दहीहंडी उत्सवासाठी एक खिडकी योजना

महानगरपालिका उतरविणार गोविंदा पथकांचा विमा विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे

मनपा क्षेत्रातील ११७ शाळा जिल्हा परिषदेकडेच !

आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष विरार : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ जिल्हा

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.