मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात इतर संस्थांकडे असलेले थकबाकी अद्यापही वसूल केली नसल्याचे समोर आले असून काही वर्षात १७ हजार २०० कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे, तर या थकबाकी ची माहिती देखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. येत्या १५ दिवसांत थकबाकीदारची यादी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने आपला महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुलिवर लक्ष दिले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत ज्यांनी मालमत्ता कर भरला नाही अश्यांची यादीच पालिकेकडे नसल्याची माहिती समोर आली आहे तर ही थकबाकी सुमारे १७ हजार २०० कोटींमध्ये आहे. मुंबई महापालिकेकडून मालमत्ता करा ज्यांनी भरला नाही, त्यांची यादी पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जायची. मात्र सध्या महापालिकेकडे यादी नसल्याचे समोर आले आहे तर १५ दिवसात यादी वेबसाईटवर टाकली जाईल असेल पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तर थकबाकी आहे त्यांना ऑक्टोबर मध्ये बिल पाठवली जाणार असुन बिल पाठवल्या नंतर यादी अद्ययावत करण्यात येणार आहे.
तर अनेकदा मालमत्ता कर थकबाकी असलेल्यांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जातो. अनेकवेळा मोठे थकबाकीदार पालिकेच्या नोटीसला प्रतिसादही देत नाहीत. यामुळे पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जात असून सध्या पालिकेने जप्त केलेल्या मालमत्ताचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक थकबाकीदारांनी सुमारे ३० टक्के थकबाकी भरली आहे. तर ‘मालमत्ता कर थकवणारे सुमारे ६७ व्यावसायिक थकबाकीदार आहेत. तर कर बुडवणा-यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावामुळे पालिकेला तब्बल ३ हजार कोटींहून अधिक महसूल मिळणार असून याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच या मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.