विलास खानोलकर
साई बोले बोल भक्ता
पृथ्वीवर आलो मी नुकता।।१।।
आकाशाची जणू उल्का
माझा प्रवास नव्हता हलका ।।२।।
सहस्त्र योजने आलो फिरून
सर्व संकटांना आलो हरवून ।।३।।
साथीला होते सारे नवग्रह
होता गंगेचा पवित्र प्रवाह।।४।।
लक्ष्मी सरस्वती मातामह
ब्रह्माविष्णू महेश पितामह ।।५।।
ज्ञानेश्वर निवृत्तीसोपान बंधुसह
मुक्ताबाईच्या तीर्थप्रसादासह ।।६।।
काश्मीर ते कन्याकुमारी माझागाव
गुजरात ते कलकत्ता माझे नाव ।।७।।
जीवन संग्रमाच्या होडीत होता तुका
रामदास भेटत होता नाका नाका ।।८।।
विठ्ठल नामदेव बंधु सखा
कृष्ण बलराम संरक्षक सक्का।।९।।
एकनाथ सुदामा देवभक्त पक्का
अर्जुन कर्ण बंधु सखा।।१०।।
चंद्रसूर्य वाटे तेज
सूर्यरथाचे घोडे तेज ।।११।।
नशीबही माझे होते तेज
सारे गुरू भेटले तेज ।।१२।।
भक्त एकापेक्षा एक सतेज
प्रसाद वाटती भाकरी पेज ।।१३।।
निजण्यास मशीदीचीच सेज
चांदोबा गाई
गाणे लगेच ।।१४।।
पहाटे उठवी कोकीळा गाणी गात
सोनेरी सूर्य किरणे गीत गात।।१५।।
पहाट वारा गंगा किनारा
तर कधी नर्मदा किनारा।।१६।।
गुलाब चाफा सुगंधी वारा
केवडा मोगरा मोर पिसारा।।१७।।
तोता राघू मैना घालती वारा
नव्हता कशाचाच नखरा।।१८।।
साधे फकीराचे आयुष्य होते
हाती झोळी कंमडलू होते ।।१९।।
अंगास लुंगी डोईस मुंडासे
श्रीमंत होते गरिबांचे ऐकत उसासे ।।२०।।
सोडवत होतो आयुष्याची कोडी
खिशात नव्हती फुटकी कवडी।।२१।।
मारून सटका संकटाला मारी फटका
दुःखाला देई मोठाच झटका ।।२२।।
सारे जनसेवेचे कार्य केले हसत
संकटाला ठेवले दूर नाचत ।।२३।।
गोरगरीब होते पिचत
संकटालाच पकडले पेचात।।२४।।
गुरूचे आशीर्वाद मोरपिसात
श्रीकृष्णाचा आशीर्वाद मोरपिसात ।।२५।।
अल्ला हो अकबर मशिदीत कबर
नमाज पठण द्वारकामाईला खबर ।।२६।।
भक्तासोबत दिवाळी दसरा
स्वभाव होता माझा हसरा ।।२७।।
पेटविली पाण्याने पणती
साक्षात्काराची नव्हती गणती ।।२८।।
भूत भविष्य वर्तमान माहीत
सदा पंचभूते होती सेवेत ।।२९।।
३३ कोटी देव साक्षीला
८४ लक्ष योजनेत जन्म जाहला।।३०।।
आओ साई बोलवी खंडोबा
प्रसन्न होता हनुमान म्हसोबा ।।३१।।
सारे देव सेवेला सदोदीत
देवदेवी सदा आनंदीत।।३२।।
जादू होती माझ्या उदीत
आशीर्वादाने होती आनंदीत ।।३३।।
नजरेत माझ्या प्रेमळ श्रद्धा
विद्वान होई स्पर्शाने गधा ।।३४।।
आई आजी डोळ्यांतूनी राजी
अपंग, अबोल जिंके बाजी ।।३५।।