मुंबई : राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ५१ तालुक्यांतल्या ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज निवडणुक होणार आहे. यासोबत आजचे थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने निवडणुकांच्या निकालाबाबत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यामधील सर्वाधिक म्हणजे १३९ तर यवतमाळ जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. आज सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत या निवडणुकीसाठा मतदान करता येणार आहे. या निवडणुकीचा निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:
नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५. धुळे: शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- ०२. बुलढाणा: जळगाव (जामोद)- ०१, संग्रामपूर- ०१, नांदुरा ०१, चिखली- ०३ व लोणार- ०२. अकोला: अकोट- ०७ व बाळापूर ०१. वाशीम : कारंजा- ०४. अमरावती धारणी- ०१, तिवसा- ०४, अमरावती- ०१ व चांदुर रेल्वे- ०१. यवतमाळ : बाभुळगाव- ०२, कळंब- ०२, यवतमाळ- ०३, महागाव – ०१. आर्णी- ०४, घाटंजी – ०६, केळापूर २५. राळेगाव- ११, मोरेगाव- ११ व झरी जामणी- ०८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- ०१. मुदखेड – ०३, नायगाव (खैरगाव)- ०४, लोहा- ०५, कंधार- ०४, मुखेड- ०५, व देगलूर – ०१. हिंगोली : (औंढा नागनाथ)- ०६. परभणी : जिंतूर- ०१ व पालम – ०४. नाशिक : कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक १७. पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ०५ व भोर- ०२. अहमदनगर: अकोले- ४५. लातूर: अहमदपूर ०१. सातारा: वाई – ०१ व सातारा- ०८. व कोल्हापूर : कागल- ०१.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…