
मुंबई (वार्ताहर) : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या (आयडॉल) जुलै सत्राच्या प्रवेशास ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत या सत्रात २७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
प्रवेशाच्या या फेरीत बारावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्र बोर्डाचे तसेच सीबीएससी व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना तसेच ज्या विद्यार्थ्यांना कोठे प्रवेश मिळाला नाही त्यांना यात प्रवेश घेता येईल.
पदवीस्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.