नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०२२ च्या अखेरीस सुरू होणा-या जी-२० बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहे. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारत जी-२० चे अध्यक्षपद भूषवणार आहे. या अंतर्गत देशभरात २०० हून अधिक जी-२० बैठकांचे आयोजन केले जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे विविध देशांतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जी-२० देशांच्या नेत्यांची शिखर परिषद होणार आहे. जी-२० मध्ये १९ देशांचा समावेश आहे. जी-२० मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूएसए आणि युरोपियन युनियन या देशांचा समावेस आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सध्याच्या ८ वर्कस्टीमचा जी-२० मध्ये समावेश आहे. यामध्ये ग्लोबल मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग, इंटरनॅशनल फायनान्शिअल आर्किटेक्चर, सस्टेनेबल फायनान्स, फायनान्शियल इन्क्लुजन, हेल्थ फायनान्स, इंटरनॅशनल टॅक्सेशन, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स विथ फायनान्स ट्रॅक, शेर्पा ट्रॅक आदींचा समावेश आहे.