बंगळुरू (वृत्तसंस्था) : भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज जसवंत बक्रानिया यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. बक्रानिया यांच्या निधनानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दु:ख व्यक्त करताना लिहिले आहे की, “जसवंतभाईंच्या दुःखद निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येकाकडून त्यांचे भाऊ अश्विन बक्रानिया आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला सांत्वन. जसवंतभाईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
बक्रोनिया यांचा जन्म पूर्ण आफ्रिकेच्या झिंझा शहरात झाला होता. मात्र, काही काळानंतर बक्रोनिया यांचे कुटुंब राजकोटला स्थानिक झाले. त्यानंतर बक्रानिया यांनी १९७० ते १९८३ दरम्यान सौराष्ट्र आणि राजकोट संघांकडून क्रिकेट खेळले. या दोन्ही संघात त्यांनी यष्टीरक्षक फलंदाजांची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५६ अ श्रेणी क्रिकेट सामन्यात ३२.३४ च्या सरासरीने ३ हजार १३७ धावा केल्या. या दरम्यान त्यांच्या बॅटमधून पाच शतक झळकली आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बक्रोनिया यांनी ५१ झेल आणि १२ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ट्विटरच्या माध्यमातून जसवंत बक्रानिया यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि गुजरात संघाकडून क्रिकेट खेळले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.