माजी क्रिकेटपटू जसवंत बक्रानिया यांचे निधन

  63

बंगळुरू (वृत्तसंस्था) : भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज जसवंत बक्रानिया यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. बक्रानिया यांच्या निधनानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दु:ख व्यक्त करताना लिहिले आहे की, "जसवंतभाईंच्या दुःखद निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येकाकडून त्यांचे भाऊ अश्विन बक्रानिया आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला सांत्वन. जसवंतभाईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”


बक्रोनिया यांचा जन्म पूर्ण आफ्रिकेच्या झिंझा शहरात झाला होता. मात्र, काही काळानंतर बक्रोनिया यांचे कुटुंब राजकोटला स्थानिक झाले. त्यानंतर बक्रानिया यांनी १९७० ते १९८३ दरम्यान सौराष्ट्र आणि राजकोट संघांकडून क्रिकेट खेळले. या दोन्ही संघात त्यांनी यष्टीरक्षक फलंदाजांची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५६ अ श्रेणी क्रिकेट सामन्यात ३२.३४ च्या सरासरीने ३ हजार १३७ धावा केल्या. या दरम्यान त्यांच्या बॅटमधून पाच शतक झळकली आहेत.


प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बक्रोनिया यांनी ५१ झेल आणि १२ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ट्विटरच्या माध्यमातून जसवंत बक्रानिया यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि गुजरात संघाकडून क्रिकेट खेळले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी