श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे एका तरूणाने मुस्लीम मुलीशी विवाह केल्यामुळे त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहाद आणि हिंदुंना टार्गेट करण्यात येत असल्याच्या निषेधार्ध श्रीरामपूर शहरात मोर्चा काढला होता. दिपक बर्डे असे अपहरण झालेल्या तरूणाचे नाव असून त्याची हत्या केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपीने दिली आहे.
दिपकने मुस्लीम मुलीशी विवाह केल्यानंतर त्याचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या एन्ट्रीनंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आणि राणे यांनी अपहरण झालेल्या तरूणाचा शोध लागावा यासाठी श्रीरामपूर येथे मोर्चा काढला होता. लव्ह जिहाद आणि हिंदू तरूणांना टार्गेट केल्याच्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली.
श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दिपकचे मुस्लीम मुलीशी प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता. त्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी दिपकला मारहाण करत मुलीला घरी नेले होते. मुलीच्या कुटुंबियांनी तिला पुण्यात मामाच्या घरी ठेवल्याचे कळाल्यानंतर दिपकने पुण्याला जायचे ठरवले होते. त्यानंतर तो पुण्याला कामाच्या शोधात जातो म्हणून घरातून निघाला होता पण त्याचे अपहरण करण्यात आले.
दरम्यान, त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केल्याचे त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी सांगितले. तर दिपकच्या कुटुंबियांनी त्याच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप केला होता. दिपकच्या वडिलांच्या फिर्यादीनंतर सात आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने दिपकच्या हत्येची कबुली दिली आहे. मृतदेह गोदावरी नदीत फेकल्याचेही आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…