‘मुख्यमंत्री किसान योजना’ आता राज्यातही लागू; शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाणार आहे.


अतिवृष्टीग्रस्तांना ३ हजार ५०१ कोटी सुपूर्द


अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शिंदे सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ३ हजार ५०१ कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द केले आहेत. जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर ३६ हजारांची मदत सरकारकडून करण्यात आली आहे. तीन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून नागरिकांना हा आर्थिक दिलासा देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : "हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये"; भाजपचे नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती प्रहार

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (UBT)

इच्छुकांची विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी महापालिका आणि पोलिसात धावाधाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता मंगळवारी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल

वांद्रे पूर्व स्कायवॉकचा खर्च १७ कोटींनी वाढला, जलवाहिनी आणि पर्जन्य जलवाहिनींमुळे वाढला खर्च

एका सरकत्या जिन्याचे बांधकाम केले रद्द मुंबई ( सचिन धानजी) : वांद्रे पूर्व येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या

पवार कुटुंबाला दिलासा; लवासा प्रकरणी दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ

Maharashtra Municipal Elections 2026 : महापालिका रणसंग्रामाला आजपासून प्रारंभ; २९ शहरांत अर्ज भरण्याची लगबग, राजकीय समीकरणांचा पेच कायम

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचा महासंग्राम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुंबईसह

भाजपची मुंबईतील बूटपॉलिशवाल्यांनाही साद

महापालिका निवडणूक प्रचाराचे अभिनव ‘फंडे’ मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकाच नव्हे, तर