अरे विन्या तू अशीच घरे बांधत राहा. पहा गुरू कृपा म्हणजे काय. मला दुकान चालवून सुद्धा घरे, विहिरी या कामाची खूप आवड होती आणि समर्थांची कृपा त्यामुळे कोण कुणाचे वाकडे करू शकत नाही. निंदा करणारे लोक खूप आहेत. रंगलेल्या तोंडाचे मुके घेणारे खूप आहेत आणि त्यांचा आम्हाला अनुभव खुप वेळा आलेला आहे. त्यामुळे मी घरे लहानसहान विहिरी, रिगांचे व्यापार करीत होतो. त्यामुळे महाराज यांची भक्त मंडळी थोडीच होती. त्यांच्या आशिर्वादाने १९६५ पासून १९९६ पर्यंत माझे काम चालू आहे. पहा गुरू कृपा म्हणजे काय. अरे नाही शिक्षण गुरंच राकना. पण महाराज यांच्या मुखातून निघालेली आकाशवाणी त्यांनी खरी करून दाखविली. संतांची सेवा कशी करावी. तर ते सर्व चराचरात भरलेले आहेत. पण आम्ही नाटकी आहोत. आम्हाला कुणी मोठा म्हणायला हवा असे नाही. भगवी वस्त्रे परिधान केली. दाढी केस वाढविले म्हणून महाराज होतो असे लोकांच्या मते आहे. पण माझ्या मते तसे नाही. जनसेवा, मनामध्ये साफ असणे, काम करणे, ज्यांच्यामध्ये राम आहे तोच खरा राम आहे. पैसा नसताना आम्ही एवढे करत होतो. आणि कुठलेही काम अपुरे राहिले नाही. यांच्या मागे राऊळ महाराज कुठे असले तरी त्यांचे लक्ष होते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आजपर्यंत त्यांनी आपले शब्द खरे करून दाखविले. अरे कुणाची निंदा करू नका जो दुसऱ्यास वाईट म्हणतो काही दिवसानी तो माणूस सर्वांच्या मनातून उतरून जातो. तेव्हा तुम्ही गुरूची साफ मनाने सेवा करा. तुमच्यावर पण गुरूकृपा होईल. आणि दयेचा पाझर फुटेल.
– समर्थ राऊळ महाराज