आजही मुसळधार पावसाने झोडपले

मुंबई : विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. ऐन गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड दैना उडाली आहे. सखल भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. लोकल सेवाही विस्कळीत झाल्याने कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील उपनगरीय वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.


पूर्व उपनगर परिसरात पडत असलेल्या पावसाचा फटका हा सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले. भांडुपमधील कोकण नगर, सह्याद्री नगर, बुद्ध नगर, पठाण तबेला या परिसरात जलमय स्थिती झाली. या परिसरातील रखडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पामुळे परिसरात नाला रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावर तसेच थेट घरांमध्ये शिरले आहे.


तर सलग दुसऱ्या दिवशीही ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. उद्या अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या तयारीत अडथळे येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील