पंतप्रधान मोदी उद्या करणार सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता इंडिया गेट येथे हा कार्यक्रम होणार आहे.


सर्वप्रथम, इंडिया गेटच्या मागे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अनेक दशकांपूर्वी राजा पाचवा जॉर्ज यांचा पुतळा ज्या छताखाली ठेवण्यात आला होता, तिथे सुभाषचंद्रा बोस यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यानंतर पीएम मोदी इंडिया गेटजवळ बांधलेल्या स्टेप्ड प्लाझाची पाहणी करतील. त्यानंतर पंतप्रधान कॅनॉल ब्रिजकडे जातील, तिथे कार्यकर्त्यांशी चर्चा होईल. यानंतर, पंतप्रधान एका प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. त्यानंतर नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी पंतप्रधानांचे मंचावर स्वागत करतील. नेताजी बोस यांच्याविषयी दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. रात्री ८ वाजता पंतप्रधानांचे भाषण होणार आहे. रात्री ८.३० वाजता नेताजी बोस यांच्या जीवनावर आधारित ड्रोन शो सादर करण्यात येईल.


विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत विस्तारलेला सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू ८ सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, लहान मुलांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि नवी दिल्लीतील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत ठराविक रस्त्यांवर सामान्य वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व