गणपती विसर्जनासाठी १० उपनगरीय विशेष गाड्या

मुंबई (वार्ताहर) : गणपती विसर्जन २०२२ निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे दि. १०.९.२०२२ रोजी (९/१०.९.२०२२ मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.


मेन लाईन - अप स्पेशल : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून मध्यरात्री ००.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ०१.३० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ०२.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून मध्यरात्री ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.०० वाजता पोहोचेल.


मुख्य लाईन - डाउन स्पेशल : कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ०३.१० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे पहाटे ०३.३० वाजता पोहोचेल. कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे सकाळी ४.५५ वाजता पोहोचेल.


हार्बर लाइन - अप स्पेशल : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ०२.२० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून मध्यरात्री ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.०५ वाजता पोहोचेल.


हार्बर लाइन - डाउन स्पेशल : पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री ०२.५० वाजता पोहोचेल. पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात