Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

अर्शदीप सिंहला खलिस्तानी म्हटल्याप्रकरणी केंद्र सरकारकडून विकीपीडियाला समन्स

अर्शदीप सिंहला खलिस्तानी म्हटल्याप्रकरणी केंद्र सरकारकडून विकीपीडियाला समन्स

नवी दिल्ली : भारत विरुद्ध पाकिस्तान दुसरा सुपर-फोर सामना रविवारी दुबईत खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाला हार पत्करावी लागली. त्यातच अर्शदीप सिंहने आसिफ अलीची कॅच सोडल्याने तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. दरम्यान, यानंतर अर्शदीपच्या विकीपीडिया पेजवर बदल झाल्याचे पाहायला मिळाले.


भारतीय किक्रेटपटू अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवर त्याचा 'खलिस्तानी' असा उल्लेख करण्यात आला होता. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने खलिस्तान संघटनाना प्रतिबिंबित करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंहची विकिपीडिया पेजवरील माहिती कशी बदलली गेली याचे स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, आता अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती दुरुस्त करण्यात आली आहे.

Comments
Add Comment