पालघर : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मेंढवण घाट परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोने गुजरात वाहिनीवर येऊन मक्याचे पीठ घेउन जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यांनतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत टेम्पो चालक जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळानंतर या वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून टेम्पो चालक जखमी झाला आहे. जखमी टेम्पो चालकाला मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर ट्रक आणि टेम्पोला लागलेल्या आगीत दोन्हीही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात वाहिनीवरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले.
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…