राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बिहारसह महाराष्ट्राच्या मुलींची विजयी सलामी

पटना (वार्ताहर) : यजमान बिहारसह महाराष्ट्राने "४८व्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत" विजयी सलामी दिली. पटना - बिहार येथील पाटलीपुत्र बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर गुरुवारपासून सुरू झालेल्या "ड" गटातील पहिल्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा ३७-१८ असा पराभव केला.


आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २ लोण देत २४-०६ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. उत्तरार्धात मात्र सावध खेळ करीत आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


ज्युली मिस्किटाचा अष्टपैलू खेळ तिला मिळालेली रेणुका नमची भक्कम पकडीची व याशिका पुजारीची चढाईची उत्तम साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय साकारला. दुसऱ्या सामन्यात गटविजेत्या हरियाणाने दुबळ्या जम्मू आणि काश्मिरचा ६१-०६ असा धुव्वा उडवीत अ गट साखळीत पहिला विजय नोंदविला.

याआधी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली.


"अ" गट :- १) हरियाणा, २) पंजाब, ३) केरळ;


"ब" गट :- १) साई, २) दिल्ली, ३)गुजरात;


"क" गट :- १) चंदीगड, २) पश्चिम बंगाल, ३) कर्नाटक;


"ड" गट :- १) महाराष्ट्र, २) तेलंगणा, ३) ओरिसा;


"इ" गट :- १) आंध्र प्रदेश (CO), २) गोवा, ३) विदर्भ, ४) उत्तराखंड;


"फ" गट :- १) राजस्थान, २) छत्तीसगड, ३) आसाम, ४) त्रिपुरा;


"ग" गट :- १)तामिळनाडू, २) हिमाचल प्रदेश, ३) मणिपूर, ४) मध्य प्रदेश;


"ह" गट :- १) झारखंड, २) उत्तर प्रदेश, ३) बिहार, ४) जम्मू आणि काश्मीर.

Comments
Add Comment

तिरुवनंतपुरममध्ये आज भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप

होम ग्राऊंडवर संजूसाठी शेवटची संधी? इशानच्या एन्ट्रीने वाढला दबाव तिरुवनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील

रंगणार थरार वर्ल्डकपचा! भारत पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या वर्ल्ड कप कधी? कुठे? पाहता येणार ....

मुंबई : विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षा कमाल स्तरावर पोहोचतात. आता हीच उत्सुकता

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ‘जनरेशन वॉर’

जोकोविच विरुद्ध अल्काराझ यांच्यात लढत मेलबर्न : मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या दोन थरारक

ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेन्काने गाठली अंतिम फेरी

मेलबर्न  :जागतिक क्रमवारीत नंबर १ टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

संजू सॅमसनऐवजी इशानला संधी?

टी-२० वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारताची तगडी सेना मुंबई  : येत्या ७ फेब्रुवारीपासून मायदेशात सुरू होणाऱ्या टी-२०