अर्नाळा आगारातून कोकणात जाणारी एसटी सेवा बंद

  136

विरार (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अर्नाळा आगारातून सकाळी ७.४५ वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-गुहागर व ७.५० वाजताची अर्नाळा-तुळजापूर ही एसटी बंद करण्यात आली आहे. तसेच दुपारी १२.३० वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-विरार-पोलादपूर व सायंकाळी ६.३० वाजता अर्नाळा आगारात येणारी पोलादपूर-विरार-अर्नाळा या एसटीची सेवाही खंडित करण्यात आल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाला आहे.


रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्स वगळता नालासोपारा व अर्नाळा एसटी आगारातून सुटणाऱ्या एसटी बस हा एकमेव पर्याय सामान्य प्रवाशांजवळ कोकणात जाण्याकरता आहे. रेल्वेकरता प्रवाशांना दादर अथवा छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठावे लागते. तर खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेदर जास्त असल्याने व ते परवडत नसल्याने सामान्य प्रवाशांची पसंती एसटीच्या बसेसला जास्त आहे. त्यातही पोलादपूर व आसपासच्या परिसरात प्रवास करण्याकरता एसटी हाच उत्तम पर्याय असल्याने अर्नाळा व नालासोपारा एसटी आगारातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे.


मात्र या आगारातून नियमित सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्याने अर्नाळा आगारातून सकाळच्या वेळात कोकणात जाण्या-येण्याकरता आता एकही एसटी उपलब्ध नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झालेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. कोकणी माणसाला अत्यंत प्रिय आणि त्याच्या हृदयाजवळचा हा सण आहे. या काळात एसटी महामंडळाने ही एसटी सेवा बंद करून कोकणी माणसांची निराशा केली आहे.


त्यामुळे ही एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. किंबहुना या एसटी फेऱ्यांसोबत विरार-अर्नाळा एसटी आगारातून दुपारी १ वाजता सुटून पोलादपूर येथे रात्रवस्ती करणारी बस सुरू करावी. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी सूचना प्रवाशांनी केली आहे.


दरम्यान, लोकआग्रह व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही एसटी सेवा तात्काळ पूर्ववत करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात देशमुख यांनी एसटी आगार व्यवस्थापकांना पत्रही दिले आहे.

Comments
Add Comment

देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी

दहीहंडी उत्सवासाठी एक खिडकी योजना

महानगरपालिका उतरविणार गोविंदा पथकांचा विमा विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे

मनपा क्षेत्रातील ११७ शाळा जिल्हा परिषदेकडेच !

आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष विरार : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ जिल्हा

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.