उत्तर प्रदेशात बोटीमध्ये साप; १७ प्रवासी बुडाले, सात जणांचा मृत्यू

  88

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बोटीतून १७ जण प्रवास करत होते, त्यावेळी अचानक त्या बोटीमध्ये साप शिरला. सापाबद्दल समजताच होडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे बोटीचा बॅलेन्स गेला आणि ती पाण्यात पलटी झाली. या दुर्घटनेत १७ जण बुडाले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांचे मृतदेह हे एनडीआरएफला मिळाले आहेत.


जिल्हा प्रशासनाकडून सात जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती जाहीर करण्यात आली तर त्यानंतर एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत बरी झाल्यानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आले. बुडालेल्या काही जणांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे एनडीआरएफच्या टीमकडून सांगण्यात आले.


मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या बोट दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. याआधी देखील बोट बुडाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त सामानासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत, रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमध्ये आता विमानसेवेप्रमाणे अतिरिक्त सामान घेऊन जाण्यासाठी शुल्क आकारले जाईल, अशा

अभिनेता विजय राजकीय रणांगणात! स्वबळावर आगामी निवडणूक लढण्याची केली घोषणा

चेन्नई: अभिनेता विजय यांनी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षासोबत

मॉस्कोमध्ये जयशंकर यांनी घेतली पुतीन यांची भेट, म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर भारत-रशिया संबंध स्थिर

मॉस्को: भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून, त्यांनी गुरुवारी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयके मंजूर महिनाभरात फक्त ३७ तास चर्चा नवी दिल्ली : महिनाभर चाललेल्या अधिवेशनात

J&K Accident : वैष्णोदेवी यात्रेला निघालेली बस ३० फूट खोल दरीत कोसळली, एकाच जागीच मृत्यू अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. सांबा जिल्ह्यातील जटवाल

तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी