तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं


आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतीपासून ते सामान्य भक्तंपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका भाविकाने अलीकडेच तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल १२१ किलो सोनं दान केलं आहे.


या सोन्याची किमत जवळपास १४० कोटी रुपये असल्याचे सांगितलं नातं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मावावत माहिती दिली. ते म्हणाले, "एका भक्ताने व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात प्रार्थना केली होती. श्री वेंकटेश्वर स्वामीच्या कृपेने त्याला व्यवसायात षश मिळाले आणि त्याने कंपनीचे ६० टक्के शेअर्स विकून ६,००० ते ७,००० कोटी रुपये नफा मिळवला. त्यानंतर त्याने १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला."


पुढे बोलताना नायडू यांनी सांगिताले की, "मंदिरातील मूर्तीला दररोज १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. ही बाब त्याला समजल्यानंतर त्याने १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे माणने त्याने हे गुप्त दान असल्याचे सांगत स्वतःची ओळख उघड न करण्याची विनंती केली बाहे." तिरुपती कलानी मंदिरात अशाप्रकारे दान देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा या मंदिराला मोठं दान मिळालं आहे.


Comments
Add Comment

Birth - Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम होणार अधिक कडक! २ वर्षांनंतर नोंदणीसाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक?

नवी दिल्ली : जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी तसेच बनावट कागदपत्रांना आळा

ICMR on Young Childrens : भारतातील लहान मुलांना गंभीर आजारांचा धोका; आयसीएमआरचा चिंताजनक इशारा

नवी दिल्ली: आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदल पालकांसाठी अत्यंत

World Tiger Day 2026: जिथे एकेकाळी गावं होती, तिथे आज वाघांची डरकाळी! सातपुड्यात वाघांचा मुक्त संचार

भोपाल : एकेकाळी मानवी वस्तीने गजबजलेला परिसर आज वाघांच्या अधिवासात रूपांतरित झाला आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा

India on POK Election : PoK निवडणुकांवर भारताचा पाकिस्तानला खरमरीत इशारा! 'हा बेकायदेशीर ताबा लपवण्याचा केवळ बनाव'

नवी दिल्ली : पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये आयोजित केलेल्या कथित विधानसभा निवडणुकांवर भारताने पुन्हा

Weather Update : ऑगस्ट महिना वाढवणार टेन्शन! मान्सून ब्रेक आणि 'अल निनो'च्या संकटात हवामानाचा नवीन अंदाज काय?

नवी दिल्ली : यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात पडलेल्या तुटपुंज्या पावसामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना

Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया संदर्भात नवे नियम लागू; नियम मोडल्यास होणार कारवाई

मुंबई : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन (online) वर्तनाबाबत वाढलेल्या प्रश्नांच्या