धुळे (वार्ताहर) : जळगाव, धुळे व नगर येथे जनावरांना होणारा लंपी या आजाराने विळखा घातला आहे. या जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या सोयगाव, सिल्लोड, कन्नड तालुक्यांना लंपी स्कीन डिसीजचा जास्त धोका असल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. फर्दापूर गावात आजार सदृश जनावरे आढळल्याने औरंगाबाद जिल्ह्यात पशुवैद्यकीय पथके तैनात करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून लंपी स्कीन आजाराचा नायनाट करण्यात आला होता. परंतु जळगाव नगर, धुळे या जिल्ह्यात या आजाराचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोयगाव, सिल्लोड या तालुक्यात संशयित जनावरे आढळून आली आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभागातर्फे पथके तयार करण्यात आली असून संशयित जनावरे आढळलेल्या पाच किलोमीटर अंतरावर औषधाची फवारणी करण्यात आली आहे.
संशयित जनावरांचा अहवाल पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून चार दिवसात याचा अहवाल येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सतर्क राहून या आजाराचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन औरंगाबाद जि.प. पशुसंवर्धन विभागाच्यातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत लंपी स्कीन डिसीज आजाराचे जनावरे आढळले नसले तरी काही जनावरांना या आजाराची लक्षणे दिसून आली आहे. दरम्यान जिल्हात पशुवैद्यकीय पथके नेमून सोडियम हायपोक्लोराइट, जंत नाशकाची गोठ्यात फवारणी करण्यात आली आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने यांनी सांगितले.
अशी आहेत रोगाची लक्षणे
जनावरांच्या त्वचेवर गाठी, डोळे, मान, पाय, कासेच्या भागात १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज येणे, जनावरे लंगडणे, डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज येणे तर जनावरांना आठवडाभर तापही येतो.
अशी घ्या काळजी
या आजारावर नियंत्रणासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. हवेशीर वातावरण ठेवावे, गोठा परिसरात पाणी, डबके, साठणार नाही याची काळजी घ्यावी, बाधित जनावरांना वेगळे करावे, बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये, जनावरांच्या संपर्कात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…