Thursday, March 27, 2025
Homeअध्यात्मउत्सवाच्या वेळी लाइटिंग करणे

उत्सवाच्या वेळी लाइटिंग करणे

महाराज यांचे भक्त प्रकाश ढोके असून त्यांचे मित्र अनिल लाइट डेकोरेटरकडे असून ढोके यांनी त्याला महाराजांच्या पहिल्या पुण्यातिथीला लाइट डेकोरेशन करायला सांगितले. पण त्यानंतर ते महाराज यांच्या जयंती पुण्यतिथी या उत्सवाला नेहमी मुंबईहून पिंगुळी येथे येऊन मठात डेकोरेशन करीत आहेत. त्याबद्दल ते काहीही अपेक्षा न करता मुंबईहून सर्व सामान आणून ५ दिवसपर्यंत लाइटिंग करतात. त्यांच्याबरोबर सर्व कामगार हेही उत्सवासाठी पिंगुळी येथे येतात व गोडीगुलाबीने वागून सर्व कामे आनंदाने करीत असतात.

ही सर्व कामे श्री समर्थ राऊळ महाराज करून घेत आहेत. उत्सवाच्या वेळी एवढी गर्दी असते की, त्यावेळी त्यांना राहण्यासाठी झोपण्यासाठी अंथरूण पांघरूण मिळत नसले तरी ते मिळेल त्यामध्ये समाधान मानून आपले लाइटचे काम खूप अवडीने करतात. प्रकाश ढोके यास महाराजसुद्धा माहीत नव्हते. तरीसुद्धा तो महाराजांचा भक्त बनला आहे. महाराजांना त्यांनी कधी पाहिलेही नाही. तरी पण त्यांची सेवा करतात नि:स्वार्थी मनाने आपल्या खर्चाने येणे व जाणे केवढी ही महाराजांबद्दल श्रद्धा आहे, पहा. अनिल हा माहीम येथे राहतो.

महाराजांच्या कृपाशिर्वादाने मी बाबांच्या उत्सवास लाइट डेकोरेशन करीत आहे, ही महाराजांची कृपा आहे. मी पिंगुळी गावी डेकोरेशनसाठी आलो. त्यानंतर माझा मुंबईमध्ये लाइट डेकोरेशनचा चांगला धंदा होतो. हे सर्व बाबांच्या कृपादृष्टीनेच होते.

– समर्थ राऊळ महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -