कल्याण : अखेर कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाच्या देखाव्याला न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. वादग्रस्त राजकीय देखाव्यामुळे कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पहाटे देखावा जप्तीची कारवाई केली होती. पोलिसांच्या या कारवाई नंतर मंडळाने घेतली न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत आज सुनावणी झाली असता न्यायालयाने या देखाव्यातील आक्षेपार्ह संवाद आणि चित्र काढून टाकण्याच्या अटीवर सशर्त परवानगी दिली आहे.
महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत रामबागेतील विजय तरूण मंडळा कडुन सार्वजनीक गणेशोत्सवात मंडळाच्या मंडपात वादग्रस्त देखावा व ध्वनीचित्रफीत तयार केली होती. त्या संदर्भात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याकडून विजय तरूण मंडळा विरूध्द गुन्हा दाखल करून सदर वादग्रस्त देखावा पोलीसांनी जप्त करून कारवाई केली होती. याबाबत विजय तरूण मंडळाने उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचीकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी मध्ये विजय तरूण मंडळाने आक्षेपार्ह देखावा (दृश्य) तसेच ध्वनीचित्रफिती मधील आक्षेपार्ह संवाद काढुन टकण्याचे मान्य करून तसे उच्च न्यायालयास समक्ष सांगीतले आहे.
त्यामुळे या विजय तरूण मंडळ यांनी सार्वजनीक गणेशोत्सवाकरीता तयार केलेला वादग्रस्त देखावा (दृश्य) व ध्वनीचित्रफित मधील आक्षेपार्ह संवाद काढुन टाकणार असल्याने त्या अटी व शर्तीचे अधिन राहुन विजय तरूण मंडळाला महात्मा फुले चौक पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…