अलिबाग, (वार्ताहर) : सणासुदीच्या कालावधीत जनतेकडून मिठाईसह खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, वनस्पती, खाद्यतेल इत्यादीची मागणी मोठया प्रमाणात केली जाते. त्यानुषंगाने जिल्हयातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.
आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने किटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा, कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक, नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडूनच खरेदी करण्यात यावेत, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा.
(१०० पीपीएम पेक्षा कमी), बंगाली मिठाई ही २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावेत, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्यदर्जाचे व उच्चप्रतीचे असावेत, मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे, विक्री बिलावर अन्न परवाना क्रमांक नमूद करण्यात यावा, त्याचप्रमाणे विक्रीसाठी सुट्ट्या स्वरुपातील भारतीय मिठाईच्या ट्रे-वर “बेस्ट बिफोर डेट” (या दिनांकपूर्वी खावा/वापरावा) नमूद करण्यात यावी, मुदतबाह्य अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत साठा व विक्री करू नये जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी या सर्व सुचनांचे पालन करावे, त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही दराडे यांनी केले आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…