Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीशेअर बाजारातील ‘ब्लॅक मंडे’ने गुंतवणूकदार हवालदिल

शेअर बाजारातील ‘ब्लॅक मंडे’ने गुंतवणूकदार हवालदिल

मुंबई : शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा ‘ब्लॅक मंडे’ ठरला असून गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सोमवारी शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८६१ अंकांची घसरण झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २४६ अंकांची घसरण झाली आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये १.४६ टक्क्यांची घसरण होऊन तो ५७,९७२ अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये १.४० टक्क्यांची घसरण होऊन तो १७,३१२ अंकांवर पोहोचला. बँक निफ्टी इंडेक्सही ७१० अंकांनी घसरला असून तो ३८,२७६ अंकांवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला.

सोमवारी १४१४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर १९८९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. २०५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज टेक महिंद्रा, इन्फोसीस, विप्रो, एचसीएल टेक्नोलॉजी आणि टीसीएस या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर ब्रिटानिया इंडस्टीज, मारुती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया आणि एशियन या कंपन्यांच्या निफ्टीध्ये वाढ झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये ०.५ टक्क्यांची घसरण झाली.

डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची ९ पैशांनी घसरण झाली आहे. आज रुपयांची किंमत ७९.९६ रुपये इतकी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाटचाल आता ८० कडे सुरू आहे. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये १२०० अंकांची घसरण झाली होती. तर निफ्टीमध्ये ३७० अंकांची घसरण दिसून आली होती. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स १०६९ अंकांच्या घसरणीसह ५७,७५३.६१ अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी ३१४ अंकांच्या घसरणीसह १७,२४४.४५ अंकांवर व्यवहार करत होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -