अवघ्या काही सेकंदात ‘ट्विन टॉवर’ भुईसपाट

Share

नवी दिल्ली : नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर अखेर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटके लावण्याचे काम करत होती.

स्फोटकांच्या मदतीने अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत आहे. इमारत पाडण्यापूर्वी आजूबाजूच्या सोसायटीतील सुमारे ५ हजार लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले.

तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आले आहेत. या पाडकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या पाडकामादरम्यान नोएडा परिसरात ५६० पोलीस, १०० राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.

नोएडातील सेक्टर ९३ ए मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पातील या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स होते. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवे लगत बांधण्यात आलेल्या या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाची जास्त होती. या टॉवर्सचे पाडकाम हाती घेण्याआधी लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. टॉवर परिसराचा जवळपास ५०० मीटरचा भाग सील करण्यात आला होता.

Recent Posts

Shah Rukh Khan : पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत!

मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…

27 minutes ago

AC Compressor: उन्हाळयात ​AC कम्प्रेसर फुटून आग लागण्याचा धोका सर्वाधिक! ही घ्या काळजी

AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण…

30 minutes ago

Nashik News : ईडीची मोठी कारवाई! मालेगावात एकाच वेळी ९ ठिकाणी छापेमारी

मालेगाव : नुकतेच सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ५० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी मुंबईतील सात ठिकाणी छापे…

39 minutes ago

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाची घरे देणार – बावनकुळे

मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.…

51 minutes ago

Black Tiger : दुर्मिळ काळे वाघ पाहायचेत; ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या!

मुंबई : आतापर्यंत अनेकांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघांबद्दल माहिती आहे. हे वाघ अनेक राज्यात…

1 hour ago

ड्रग्ज डॉनच्या बापाची आत्महत्या! आत्महत्येच्या चिठ्ठीत धक्कादायक आरोप! नवी मुंबईत खळबळ

नवी मुंबई : भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकरचे वडील आणि नामांकित बांधकाम…

2 hours ago