सोनाली फोगाटच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक

पणजी : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्येप्रकरणी आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली होती. आता पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला आणि अंजुना बीच जवळील कर्लीज हॉटेलच्या मालकाला अटक केली आहे. आरोपी सुधीर सांगवान हा ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. त्यानेच या ड्रग्ज पेडलरची ओळख पोलिसांना सांगितली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्लीज हॉटेलच्या बाथरुममध्ये ड्रग्ज आढळले. सिन्थेटिक ड्रग्ज हे त्या बाथरुममध्ये मिळाले, जिथे सोनाली होत्या. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली. आतापर्यंत सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. सुधीर सांगवान, सूखविंदर सिंह, कर्लीज हॉटेचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.


आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी हे सोनाली यांच्यासोबत पार्टी करताना दिसत आहेत. सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते. सोनालीला द्रव स्वरुपात ड्रग्ज देण्यात आल्याची कबुली सुखविंदरने दिली आहे. सुखविंदर आणि सुधीर सांगवान हे सोनाली फोगाट यांच्यासोबत टॉयलेटमध्ये गेले होते, तिथे २ तास थांबले. तिथे काय झाले? याची चौकशी केल्यावर सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. सध्या चौकशी सुरु असून, अधिक माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे, गोवा पोलीस महासंचालक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी दिली.

Comments
Add Comment

'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून

आगळीक कराल तर याद राखा; पाकिस्तानची इंच न् इंच जमीन 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा लखनऊमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तयार;

सणासुदीच्या बाजारात ७ लाख कोटींची ऐतिहासिक खरेदी; मोदींच्या जीएसटी कपातीचा 'जादुई' प्रभाव!

महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी दर कपातीच्या

मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या

'या' ८ राज्यांमध्ये मतदानाच्या दिवशी 'सवेतन' सुट्टी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

बिहार विधानसभा आणि पोटनिवडणुकांसाठी घोषणा; पगार कपात करणाऱ्या मालकांवर कारवाई होणार नवी दिल्ली: भारतीय निवडणूक

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण