दिल्लीत आपचे ४० आमदार बेपत्ता!

  83

नवी दिल्ली : दिल्लीतील ऑपरेशन लोटसवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे, मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही.


आपचे आमदार दिलीप पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल संध्याकाळपासून काही आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही सतत बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच सर्व आमदार बैठकीला पोहोचतील. आमचे ४० आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.


आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी पत्रकार परिषद घेतली. आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, आम्ही ऑपरेशन लोटसबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, भाजपने आमच्या आमदारांना ऑफर दिली. 'आप' सोडल्यास २० कोटी आणि इतरांना सोबत आणले तर २५ कोटी देऊ, अशी ऑफर होती.


संजय सिंह म्हणाले, आमचे आमदार संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराला भाजपने पक्ष सोडण्याच्या बदल्यात २० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. संजय सिंह यांच्यासोबत सोमनाथ भारतीही पत्रकार परिषदेत होते. ते म्हणाले की, भाजपच्या लोकांनी मला सांगितले की 'आप'चे आणखी २० आमदार आमच्या संपर्कात आहेत.


सीबीआयने उत्पादन शुल्क धोरणाबाबत दिल्लीत पहिल्यांदाच १९ ऑगस्ट रोजी मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. हा छापा सुमारे १४ तास चालला, त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आप केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपच्या विरोधात आवाज उठवत आहे. छापेमारीनंतर सिसोदिया म्हणाले होते की, भाजपने त्यांना 'आप' सोडण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती.


दुसरीकडे भाजपने प्रत्युत्तरात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्यासाठी आम आदमी पार्टी खोटेपणाचे वातावरण तयार करत आहे. मनीष सिसोदिया यांना उत्तर द्यावे लागेल, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी सांगितले होते.


७० जागांच्या दिल्ली विधानसभेत 'आप'ला ६२ आणि भाजपला ८ जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी ३६ आमदारांची गरज आहे.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात