कुस्तीत भारताची दंगल

नायरोबी (वृत्तसंस्था) : नायरोबी येथे पार पडलेल्या अंडर-२० ज्युनियर कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह १६ पदके जिंकण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानावर राहिला आहे.


महिला आणि पुरुष फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारताने ७-७ पदके आपल्या नावावर केली. तर, ग्रीको रोमनमध्येही दोन पदके जिंकली. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारत पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.


जपान ९ सुवर्णांसह १५ पदके जिंकत पहिल्या स्थानी आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताचा रोहित दहिया व सुमितने कांस्यपदक जिंकले. नुकतीच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या २२व्या हंगामात भारताने दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने २२ सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदके जिंकली.


पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव


दरम्यान भारतीय खेळाडूंच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदक विजेत्या कुस्तीपटूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी ट्वीट करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "भारताच्या कुस्तीपटूंमुळे पुन्हा एकदा आम्हाला अभिमानास्पद वाटत आहे. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १६ पदके (पुरुष आणि महिला फ्रीस्टाइलमध्ये प्रत्येकी ७ आणि ग्रीको-रोमनमध्ये २) जिंकल्याबद्दल आमच्या टीमचे अभिनंदन. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हे भारतीय कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असल्याचे देखील दर्शवते.”


https://twitter.com/narendramodi/status/1561728629872132096
Comments
Add Comment

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक

भारत विरुद्ध न्यूझीलंड ‘वन-डे’ची आजपासून रणधुमाळी

स्टार खेळाडूंचे पुनरागमन; जयस्वाल-पंत कट्ट्यावर? बडोदरा : भारतीय क्रिकेट संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी, रविवार (११

Cricket News: स्थानिक क्रिकेटपटुचा सामानादरम्यान मैदानातच मृत्यु; खेळता खेळता अचानक खाली पडला..

मिझोरममध्ये क्रिकेटसृष्टीत दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि वेंघनुई रेडर्स सीसीचे

तिलक वर्मा दुखापतग्रस्त

नवी दिल्ली : आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. युवा आणि प्रतिभावान

अॅशेसवर ऑस्ट्रेलियाचेच नांव

इंग्लंडवर ५ गडी राखून विजय; मालिका ४-१ ने खिशात सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या