नवी दिल्ली : न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच असे नाही, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत कायदा सांगायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशभरात कोट्यवधीहून अधिक खटले प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
यशवंतराव चंद्रचूड स्मृती व्याख्यानमालेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयांमध्ये चार कोटी, उच्च न्यायालयांमध्ये एक कोटीहून अधिक आणि सर्वोच्च न्यायालयात जवळपास ७२ हजार खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे नेहमीच्या प्रक्रियेने हे सगळे खटले मार्गी लागणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायालयात गेल्यावर न्याय मिळतोच असे नाही.
गेल्या काही वर्षांत वकिली क्षेत्राचे रूपांतर व्यवसायाकडून व्यापारात झाले आहे. न्यायदानाच्या क्षेत्रातील वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगितला पाहिजे, असे मतही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…