नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे. तो सप्टेंबरमध्ये वॉरविकशायरसाठी हंगामातील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. यंदाच्या हंगामात वॉरविकशायरकडून खेळणारा सिराज हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी क्रुणाल पंड्याने रॉयल लंडन कप एकदिवसीय चॅम्पियनशिपसाठी क्लबशी करार केला होता.
“वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबने मोहम्मद सिराजला काउंटी चॅम्पियनशिप हंगामातील अंतिम तीन सामन्यांसाठी करारबद्ध केले आहे,” असे काउंटी क्लबने एका निवेदनात म्हटले आहे. १२ सप्टेंबर रोजी सॉमरसेट विरुद्ध घरच्या सामन्यापूर्वी ते एजबॅस्टन येथे पोहोचतील.
संघाशी करार करण्याबाबत सिराज म्हणाला, “मी वॉरविकशायर (बेअर्स संघ) मध्ये सामील होण्यास उत्सुक आहे. भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये खेळण्याचा मला नेहमीच आनंद वाटतो आणि काउंटी क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे.