जन्माष्ठमीचा दिवस तुम्हाला समर्पित - देवेंद्र फडणवीस

  75

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे तरुणाईचे सरकार असून आजचा जन्माष्ठमीचा दिवस तुम्हाला समर्पित असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थित होते.


फडणवीस म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडतोय आणि श्रीकृष्णाची हंडी यासाठी फोडतोय कारण यातील विकासरुपी मलाईचा भाग सर्वांना मिळायला हवा. कालच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, गोविंदाचा साहसी खेळांमध्ये समाविष्ठ झालाय. आता तुम्ही केवळ गोविंदा पथक नाही आहात, तर खेळाच्या टीम्स आहात. आता तुम्हाला खेळाडूंचा सर्व दर्जा मिळणार आहे. तुमची सर्व काळजी राज्य सरकार घेणार आहे. हे तुमचे तरुणाईचे सरकार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला समर्पित करतो आणि जन्माष्ठमीच्या शुभेच्छा देतो.


मुंबई महानगरपालिकेत मुंबईची सेवा करताना मुंबईचा असा विकास होऊ दे की, संपूर्ण जगात मुंबईचे नाव अग्रणी राहिलेच पाहिजे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार दूर करायचा आहे. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे तुकडे करण्याची ही हंडी फोडावी, असे यावेळी आशिष शेलार म्हणाले.

Comments
Add Comment

जरांगेंनी उपोषण सोडले, फडणवीस सरकारने ६ मागण्या केल्या मान्य; मराठ्यांचा विजय

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. जरांगे यांनी मंगळवारी पाच दिवसांपासून सुरु

मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण

मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले.

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या

जरांगेंचा मोठा विजय... हैदराबाद गॅझेट लागू होणार; सर्व मागण्या झाल्या मान्य!

राज्य सरकार कडून जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या

Maratha Reservation: विखे पाटील अंतिम मसुदा घेऊन जरांगेंना भेटले, आजच होणार मोठा निर्णय!

मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आमरण

भगव्याच्या मदतीला हिरवे?... "जरांगेना पोलिसांनी हाथ लावल्यास मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल" जलील यांचा मुंबई पोलिसांना इशारा!

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत