नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे तीन धक्के बसले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आदी भागांत काही दिवसांपूर्वी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील विविध गावांना हे धक्के मंगळवारी रात्री जाणवले आहेत. नाशिकच्या मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी, ९ वाजून ३४ मिनिटांनी आणि ९ वाजून ४२ मिनिटांनी असे तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या सौम्य धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे ३.४, २.१ आणि १.९ असून नाशिक वेधशाळेपासून १६ ते २० किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे.
दिंडोरी तालुक्यातील, दिंडोरी शहर, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी, जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव येथे भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर काहीतरी आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. परिसरात सर्वात जास्त हादरे जांबुटके गावात बसत सांगण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिंडोरी तालुक्यात विविध गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याबाबत मेरी येथील संशोधन केंद्रात त्याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कळते. याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरुन जाऊ नये असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…