मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूने करण ग्रोव्हरसोबत लग्न केल्यानंतर आता सहा वर्षांनी गरोदर आहे. आई होणार असल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला असून तिने बेबी बंप फोटोशूट केलेले फोटो सोशल मीडियावर टाकले असून काही अवधीतच ते जोरदार व्हायरल झाले आहेत. हे फोटोशूट सर्वानाच पसंत आले आणि सगळ्यांचेच लक्ष तिच्या बोल्ड लुककडे आणि बेबी बंपकडे जात होते. याआधी आलिया भट्ट आणि सोनम कपूर हिने आपल्या मॅटर्निटी फॅशनने सगळ्यांनाच इम्प्रेस केले होते.
बिपाशाने अत्यंत बोल्ड अंदाजात मॅटर्निटी फोटोशूट केले आहे आणि त्यात तिचा पती करण ग्रोव्हर देखील दिसून आला. बिपाशाने करणसोबत हॉट अंदाजात हे फोटोज काढून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये तिचे बेबी बंप सुद्धा स्पष्ट दिसत होते.
बिपाशा बासूने आपल्या इंस्टाग्रामवर खास मेसेज शेअर करून आपल्या या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज सुद्धा सोबत शेअर केले आहेत.
तर दुसरीकडे अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपली आगामी फिल्म ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याचवेळी आलिया भट्ट ही प्रेग्नेंसीचे सर्वात गोड दिवस एन्जॉय करत आहे. आलियानेही लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज शेअर केले आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…