रोहा (वार्ताहर) : युरोपातील ईस्टोस्निया या देशात नुकत्याच पार पडलेल्या जागतिक फिल्ड आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धेत सर्वेश निवास थळे याने रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत ४७ देशांचा सहभाग होता.
मूळचा अलिबाग तालुक्यातील कुर्डुस या गावातील सर्वेश थळे हा सध्या रोठखुर्द रोहा येथे राहतो. तेथेच राहून त्याने धनुर्विद्येचे धडे घेतले. अनेक जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धा, शालेय स्पर्धा, सी.बी.एस.सी. या स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याची निवड भारतीय तिरंदाजी संघात झाली. अंडर १४ या गटात त्याची भारतीय संघात निवड झाली.
सर्वेशचे वडील निवास थळे हे पुगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असून ते एक उत्तम क्रीडापटू, राष्ट्रीय कबड्डी पंच, खो-खो पंच, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा समन्वयक आहेत. सर्वेशच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. ईस्टोस्नियातील भारतीय दूतावासात भारतीय राजदूत अजनीश कुमार यांनी सर्वेशचा आणि भारतीय संघाचा सत्कार केला.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…