Categories: ठाणे

डोंबिवलीत दीडशे फूट ध्वजस्तंभावर फडकला तिरंगा

Share

डोंबिवली (वार्ताहर) : दत्तनगर येथील स्वातंत्र्यसेनानी स्मृती स्थळाजवळील ठाणे जिल्ह्यातील सर्वोच्च उतुंग असलेल्या १५० फूट ध्वजस्तंभावरील झेंडा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालिका आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी जय हिंद घोषणांनी परिसर दणाणून गेला.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ७६ व ७७ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. शिंदे समर्थक नगरसेवक राजेश मोरे आणि नगरसेविका भारती मोरे यांनी हा सोहळा आयोजित केला होता. या राष्ट्रीय उत्सव सोहळ्यात हजारो डोंबिवलीकर सहभागी झाले होते. प्रभागात सप्तरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण विभाग झगमगला होता.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, ७५ व्या वर्षी आज देश महाशक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक विकासाची कामे देशात, अनेक शहरात सुरू आहेत. देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सर्व देश आनंदाने कार्यक्रम साजरा करत आहे.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, मंदार हळबे, रवी पाटील, नितीन पाटील, संजय पावशे, रणजित जोशी, माजी नगरसेविका वृषाली जोशी, पालिका कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, सायली विचारे, सुरेखा पांडे, राजेश कदम, गजानन व्यापारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Recent Posts

प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे

इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान…

4 minutes ago

Seema Haider: सीमा हैदरला देखील आता पाकिस्तानात परतावं लागणार? जूने प्रकरण पुन्हा चर्चेत

उत्तर प्रदेश: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशातील सर्व…

18 minutes ago

Rahul Gandhi: “बेजबाबदार वक्तव्य करू नका”, सावरकर यांच्यावरील टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त (Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar)…

1 hour ago

इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे बंगळुरूत निधन

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…

2 hours ago

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…

2 hours ago

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

3 hours ago