नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेले भाषण हेदेखील एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या भाषणाच्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सर्वाधिक लांबीच्या भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर १ तास २२ मिनिटे ३२ सेकंदांचे भाषण केले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनीच सर्वाधिक लांबीचे भाषण केले होते. मात्र, आता त्यांनी स्वत:चाच हा विक्रम मोडीत काढला आहे.
१९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी देशाला उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणाची लांबी ७२ मिनिटे होती. २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी ९४ मिनिटांचे भाषण करत हा विक्रम मोडीत काढला. २०१४ पासून नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात तीन वेळा ९० मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बोलले आहेत. २०१७ साली ते सर्वात कमी म्हणजे ५६ मिनिटं बोलले होते. तर २०१८ मध्ये ८३ मिनिटं, २०१९ मध्ये ९२ मिनिटं, २०२० मध्ये ९० मिनिटं, तर २०२१ मध्ये ८८ मिनिटांचे भाषण पंतप्रधान मोदींनी केले होते.
नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत अलीकडच्या काळातील पंतप्रधानांच्या भाषणाची लांबी फारच कमी होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ आणि २००३ साली अनुक्रमे २५ आणि ३० मिनिटांचे भाषण केले होते. मनमोहन सिंह यांनी दहा वेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी ५० मिनिटं इतका होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच लांबलचक भाषणांची सुरु केलेली परंपरा कायम आहे. आज नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक लांबीचे भाषण करुन नवा मापदंड रचला आहे.
आगामी काळात भारताच्या विकासाच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचप्राण’ या नव्या संकल्पनेनुसार वाटचाल करण्याची घोषणा केली आहे.
देशाला संबोधित करताना मोदी यांनी भारतीयांना पाच संकल्प दिले. येत्या काळात आपण ‘पंचप्राण’ वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…