|
नोकरदारांना मोठा दिलासा
मेष – या सप्ताहात आपली राशी चांगली प्रगती करणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यवसायात प्रगती करता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. बौद्धिक क्षेत्रात वाव मिळणार आहे. प्रकृती मात्र जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होणार आहे. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळणार आहे. प्रवासाची शक्यता आहे. नव्या घटनांना काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. विरुद्धी लिंगी व्यक्तींबरोबर गैरसमज होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी काही प्रमाणात जाणवणार आहेत.
|
|
जमिनीच्या व्यवहारात यश
वृषभ – एखाद्या नवीन क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करायचे ठरविले असल्यास त्यामध्ये खूप विचार करावयास हवा. कारण खर्च वाढणार आहे. आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील. छंदासाठी मित्र व सहकारी मदत करणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करणार आहात. आरामदायी वस्तूवर आपला खर्च होणार आहे. जोडीदाराशी चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत. भागीदारीमध्ये सर्वसाधारण फायदे होणार आहेत. मात्र कोणताही धोका पत्करू नका. आपले संवाद चांगले असल्यामुळे एखादी चांगली बातमी समजू शकेल. जमिनीच्या व्यवहारात यश येणार आहे. |
|
व्यापार-व्यवसायात प्रगती
मिथुन – आपल्या स्वकष्टाला यश येणार आहे. सतत कार्यशील आणि प्रयत्नवादी राहा. कंटाळा किंवा आळस करू नका. कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. आपल्या स्वतःच्या नैतिक नैपुण्याद्वारे यश मिळू शकणार आहे. दैनंदिन कामांमध्ये व्यग्र असणार आहात. व्यापार-व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे.सन्माननीय व्यक्तींची गाठीभेटी व मैत्रीचे संबंध वाढतील. संततीच्या प्रगतीने समाधान वाटणार आहे. स्वतःच्या क्षमतेने प्रगती होणार आहे. कामाचा उत्साह वाढणार आहे. आर्थिक बाजू चांगली राहणार आहे. सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. |
|
चांगले लाभ मिळतील
कर्क – या सप्ताहात आपण आत्मविश्वासपूर्वक कामे करणार आहात. सरकारी किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचा चांगल्या कार्यासाठी वापर करणार आहात. आपल्या कार्यक्षेत्र अधिकारांमध्ये वृद्धी होईल. रखडलेली कामे मार्गी लागातील. प्रवास कार्यसिद्ध राहतील. मात्र कुटुंबामध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. एखाद्या व्यक्तीचे आजारपण किंवा कुटुंबातील छोट्या-मोठ्या वादाकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे मानसिक शांतताभंग होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे लोक आदराने बघणार आहेत. नोकरीत वरिष्ठांकडून चांगले लाभ मिळतील. नवीन प्रयत्न फलदायी ठरतील.
|
|
चांगली प्रगती होईल
सिंह – हा सप्ताह आपणास संमिश्र घटनांचा आहे. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. डोळ्यासंबंधित तक्रारी येऊ शकतात. सरकारी किंवा वरिष्ठ व्यक्तींशी वाद-विवाद टाळा. या संदर्भात सतर्क राहणे फार आवश्यक आहे. भागीदारीमधील व्यवसायात लक्ष देणे फार आवश्यक आहे. त्यातून तुम्हाला अपेक्षित फायदे होतील. एखाद्या नवीन प्रकल्पातून आपल्याला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. जी योजना राबवत आहात त्याच्यात नशीब आपल्या बाजूने असणार आहे. योग्य निर्णय होतील. आपल्या कारकिर्दीत चांगली प्रगती होईल.
|
|
आर्थिक वृद्धी होईल
कन्या – प्रेमप्रकरणांमधून सावध असावे. फसवणुकीची शक्यता आहे. परिस्थितीचे भान ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. विरोध वाढू शकतो. आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींनी बोलताना फार सावध राहणे आवश्यक आहे. एखादा शब्दाने वाद-विवाद किंवा मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आपण सावध राहणे आवश्यक आहे. मात्र आपण आपल्या कार्यात सातत्य आणि नियोजनबद्ध काम केल्यास आर्थिक वृद्धी होईल. जमीन-जुमला, स्थावर मालमत्ताविषयीचे व्यवहार मार्गी लागतील.
|
|
जोडीदाराचा सल्ला मोलाचा
तूळ – काही खर्च अचानक समोर येणार आहेत. शिवाय आपल्या झोपेवर पण याचा परिणाम होणार आहे. प्रकृती स्वास्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ज्या स्त्रिया कामासाठी बाहेर पडत आहेत, त्यांनी आपली स्वतःची काळजी घेणे फार आवश्यक आहे. सर्व गोष्टीत सद्सदविवेकबुद्धीने विचार करणे फार आवश्यक आहे. या सर्व काळामध्ये आपल्या जोडीदाराचा सल्ला फार मोलाचा ठरणार आहे. नवीन व्यवसायासाठी बँक बॅलन्ससाठी चर्चा करून निर्णय ठरवा. नवीन करारातून चांगले लाभ होणार आहेत. कुटुंबात पत्नीचा सल्ला अवश्य घ्या.
|
|
नवीन योजना आखाल
वृश्चिक – वैवाहिक जीवनामध्ये कडू-गोड प्रसंग येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लहान-मोठे वादविवाद निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा मान ठेवणे हिताचे ठरेल. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये मात्र कुटुंबांमध्ये शांती असणार आहे. काहींचे विवाह अचानक ठरवून होतीलही. नवीन योजना आखून त्या कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मात्र सर्व बाबतीत धैर्याने समोर जाणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची घाई-गडबड नको. दूरदर्शीप्रमाणे विचार करावा.
|
|
समृद्धी व उत्पन्नाचा लाभ
धनु – तुमचे काम करण्याची, जास्त कष्ट करण्याची तयारी असेल, तर हा कालावधी तुम्हाला निश्चित यश मिळवून देणारा असणार आहे. प्रयत्नशील राहणे फायद्याचे ठरेल. या कालावधीमध्ये नवीन संधी मिळणार आहेत. आपले निर्णय योग्य होण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेतले, तर चांगले ठरेल. इतरांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्जासाठी अर्ज केला असेल, तर मंजूर होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये आणि खासगी क्षेत्रामध्ये चांगला समतोल साधणार आहात. खूप कष्ट करून तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला समृद्धी, उत्पन्न यांचा चांगला लाभ मिळणार आहे.
|
|
कष्टाची तयारी ठेवा
मकर – आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेम प्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होण्याची शक्यता आहे. पैसे अडकल्याने पैशाची कमतरता भासू शकते. तरीसुद्धा वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर प्रगती करू शकाल. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. कष्ट करण्याची तयारी असल्यास कष्टाचे चीज होईल. त्यासाठी हा अनुकूल कालावधी असेल. सार्वजनिक ठिकाणी सन्मानाचे योग आहेत. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची शक्यता आहे. कष्टाची तयारी ठेवा. आर्थिक फायदे निश्चित होईल.
|
|
अडचणींवर मात कराल
कुंभ – आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. तुम्ही सर्व अडचणींवर चांगल्या तऱ्हेने मात करणार आहे. आज शत्रूचा पराजय होईल. नोकरीमध्ये चांगला कालावधी आहे. कायदेशीर बाब चांगली सांभाळा. मित्रांनी अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आपणास लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदे होतील. मुलांच्या यशामुळे आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे. मात्र अति आत्मविश्वास टाळणे हितकारक. घरातील व्यक्तींच्या आरोग्यविषयक तक्रारी येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नाती जपा. काही गोष्टीने विनाकारण मनस्ताप होण्याची शक्यता आहे. |
|
फायदे होतील
मीन – कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका. स्वतःचे काम स्वतः करा. इतरांवर अवलंबून राहणे नुकसानकारक ठरू शकते. शांतपणे निर्णय घेण्याची गरज. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र परदेशी संबंधातून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. या कालावधीमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एखादा धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन प्रकल्प हाती घ्याल. त्यात यश येईल. उद्योग व्यवसायातून फायदा मिळणार आहे. चुकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे.
|