मुंबई : मुंबई शेअर बाजारातील ‘बिग बुल’ अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
झुनझुनवाला हे मागील काही वर्षांपासून आजारी होते. प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे.
राकेश झुनझुनवाला हे कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे. जुलै २०२२ अखेरीस त्यांची संपत्ती ५.५ अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत ३२ व्या स्थानी होते.