डॉ. मिलिंद घारपुरे
ग्रुपमधला एक समवयस्क मित्र. Treck, Rock climbing याची प्रचंड आवड… त्याच्या ‘चढाओढीच्या’ गोष्टी आणि फोटो यांनी आमची महिन्यातली एखादी तरी रविवार सकाळ नक्कीच रंगणारी. मागच्या दिवाळीला कधीतरी अचानक त्याची कंबरदुखी चालू झाली. चांगलीच वाढली. Lumbar disk issue… आधी साधी औषधे. मग ऑर्थोपेडिक, spine specialist. MRI, CT scan. मग ढीगभर औषधे. फिजिओथेरपी, ॲक्युपंचर वगैरे वगैरे… प्रत्येक डॉक्टरची त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार ट्रीटमेंट. उपयोग शून्य!!! एक मोलाचा सल्ला समस्त डॉक्टरांचा… “तुझ्या ऍक्टिव्हिटीज थांबव.”
ट्रेकिंग वगैरे थांबलं… ऑफिस चालू वेदना सहन करत, अगदी कसबसं. अचानक आठवड्यांपूर्वी त्याचे फेसबुकवरचे कुठल्यातरी गडावरचे फोटो बघून मी अवाक्… कॉल केला… “वाह मित्रा… गुड टू सी यू बॅक. कोणाची ट्रीटमेंट घेतलीस?”
तो प्रसन्न हसत… “अरे , एक सीनिअर वैद्य आहेत. गेलो. सगळी हिस्टरी ऐकून घेतली त्यांनी. लावायला एक तेल दिलं फक्त… म्हणले…. “स्वतःवरच ‘प्रेम’ जरा कमी करून बघ, नक्की वेदना कमी होतील.”
…म्हणजे काय रे..???
अरे काही नाही… मी, मला, माझं असं सतत म्हणून म्हणून शरीराला, मनाला कुरवाळत बसणारे आपण… आता यापुढे मला आनंद देणारी कोणतीही कृती मी करू शकेन की नाही या भीतीनेच वेदना वाढतात.
वेदनेचे तत्त्वज्ञान… कुठल्याही सायन्समध्ये न बसणारं…!
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…