मुंबई : शिंदे गटाकडून आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता मुंबईत पहिल्या शाखेचे उद्धाटन केले आहे. शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या मतदारसंघात मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचे उद्धाटन केले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत सुरु असलेल्या शिंदे-ठाकरे संघर्षाला नवे वळण लागले आहे. एकीकडे शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाकडून सातत्याने केला जात असताना आता शिंदे गटाने प्रत्येक विभागात शाखा आणि दादर, ठाण्यात मध्यवर्ती कार्यालय म्हणजे प्रति शिवसेना भवन उभारण्याचे ठरवले आहे.
विशेष म्हणजे राहुल शेवाळेंनी उद्धाटन केलेल्या शाखेवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. या शाखेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो वगळण्यात आले आहेत.
यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की, मुंबईत शहरात हा पहिलाच वार्ड येतो. मुंबई शहरात इथूनच प्रवेश होतो. याठिकाणी पहिल्या शाखेचे उद्धाटन होत आहे त्याचा आनंद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भगवा फडकवण्याचा संकल्प आमचा आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेनेच्या अशा शाखा उभ्या राहतील, असे त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार गेले आहेत. त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बनवण्यात आली आहे. आम्ही खरी शिवसेना आहोत. आमच्याकडे बहुमत आहे असा दावा करत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह आम्हाला मिळावे अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यात आता एकनाथ शिंदे यांनी दादर भागात प्रति शिवसेना भवन उभारत थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले आहे.
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…