रविवारपासून लासलगाव येथे ‘कामायनी एक्सप्रेस’ थांबणार

लासलगाव (प्रतिनिधी) : कोविड -१९ मुळे गेल्या २ वर्षांपासून ‘कामायनी एक्सप्रेस’ चा (११०७२ अप - ११०७१ डाऊन) या गाडीचा थांबा लासलगाव व नांदगाव स्टेशनसाठी रद्द झाला होता. परंतु केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून या गाडीचा थांबा रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ पासून या दोन्ही रेल्वे स्थानकांवर पूर्ववत होत असल्याची माहिती भाजपच्या महिला मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सुवर्णा जगताप यांनी दिली.


कामायनी एक्सप्रेसच्या लासलगाव व नांदगाव रेल्वे स्टेशनवरील थांब्यामुळे सर्व रेल्वे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी घटक या सर्वांचाच फायदा होणार असून या सर्वाना दिलासा मिळणार आहे.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंधेला हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे प्रवाशांनी अभिनंदन केले आहे. रविवार दि. १४ तारखेला संध्याकाळी ५.४० वाजता डॉ. भारती पवार कामायनी एक्सप्रेसला व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे झेंडा दाखवणार आहेत. सर्वांनी लासलगाव रेल्वे स्टेशन येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सुवर्णा जगताप यांनी केले आहे.

Comments
Add Comment

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह नऊ राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या केल्या असून

नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी

कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड